BIG BREAKING रामदास आठवलेंच्या औरंगाबाद येथील सभेत तुफान राडा

Foto
औरंगाबाद-  नामविस्तार दिनाच्या निमित्ताने औरंगाबादेत आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या सभेत तुफान राडा पाहण्यास मिळाला. संतप्त जमावाने सभेत मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची तोडफोड केली आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाल्याची माहिती समोर येत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले या सभेला संबोधित करत होते. त्यावेळी श्रोत्यांमधील एका व्यक्तीने आक्षेपार्ह विधान केले. सुरुवातीला काही जणांनी घोषणाबाजी केली. यानंतर दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला. यामध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. तसेच तुरळक दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. त्यानंतर या सभेला पुन्हा सुरुवात झाली. मात्र, सध्या या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. 

गेल्यावर्षीही नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमात आठवले यांना भाषणादरम्यान विरोधाचा सामना करावा लागला होता. नामांतराच्या या चळवळीत रामदास आठवले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे या कार्यक्रमात त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची असते. दरवर्षी नामविस्तार दिन सोहळ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक संघटनेचा स्वतंत्र मंच उभारण्यात येतो. मात्र, गेल्यावर्षीपासून दलित संघटनांनी एकाच मंचावरून सोहळा पार पाडण्याचा ठराव मंजूर केला होता.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker